बोकडाला लागलंय चक्क तंबाखूचं व्यसन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

goat addicted tobacco at chandrapur

बोकडाला चक्क तंबाखूचे व्यसन लागले आहे. दिवसातून एक-दोनदा नव्हे तर 10 ते 15 वेळा तंबाखू खातो.

बोकडाला लागलंय चक्क तंबाखूचं व्यसन...

चंद्रपूर: वरोरा शहरातील एक बोकड चर्चेत आला असून, त्याला पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करू लागले आहे. कारण, या बोकडाला चक्क तंबाखूचे व्यसन लागले आहे. दिवसातून एक-दोनदा नव्हे तर 10 ते 15 वेळा तंबाखू खातो. गवतापेक्षा तंबाखू खाण्याकडे त्याची जास्त ओढ पाहायला मिळते.

तंबाखू खाणारा बोकड म्हणून या बोकडाकडे अनेकजण कुतुहलाने पाहतात. गेल्या दोन वर्षांपासून हा बोकड शहरामध्ये फिरत असून, तो दर्ग्याला भेट म्हणून सोडण्यात आला होता. त्यामुळे या बोकडाकडे कोणी वाईट नजरेने पाहात नाही. पण, या बोकडाला प्लास्टिकमध्ये गुंडाळून असलेला खर्रा (तंबाखू) दिसताच तो पळतच येतो. गवत खाण्यापेक्षा तंबाखू खाण्याकडे त्याची जास्त ओढ पाहायला मिळते. दिवसभरात तो 10 ते 15 वेळा तंबाखू खातो. तंबाखू खाल्ल्यामुळे त्याला गुंगी येताना दिसते. बोकडाच्या तंबाखूच्या व्यसनामुळे तो चर्चेत आला असून, त्याला पाहण्यासाठी अनेकजण येत आहेत.

दरम्यान, बोकडाला गंमत म्हणून कोणीतरी तंबाखू खाण्याची लावलेली सवय आता व्यसन बनली आहे. मुक्या प्राण्याला ही लागलेली सवय जीवघेणी नसली तरी त्याच्यासाठी अपायकारक ठरू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top