वीज पडून पंचवीस बकऱ्या ठार पाच जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

goats killed five injured lightning strike

वीज पडून पंचवीस बकऱ्या ठार पाच जखमी

राजुरा : सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या विजेच्या गळगळाटासह पावसात बकऱ्या चारत असलेल्या सोंडो येथील शेतकरी वासुदेव पोचण्णा जिटापेन्नेवार यांच्या जवळ असलेल्या बकऱ्याच्या कळपावर ५:३० वाजता वीज पडली असता यात वासुदेव जिटापेन्नेवार यांच्या बावीस बकऱ्या, देवराव अरके यांची एक बकरी व मनोज मेनगीनवार यांच्या दोन बकऱ्या जागीच ठार झाला तर पाच बकऱ्या जखमी झाल्या असून बकऱ्या चारणार वासुदेव जिटापेन्नेवार हा थोडक्यात बचावल्याची घटना उघडकीस आली आहे.

प्राप्त माहितीनुसार राजुरा तालुक्यातील सोंडो येथील शेतकरी वासुदेव पोचण्णा जिटापेन्नेवार हे गावालगत असलेल्या आपल्या शेतात बकऱ्या चारण्यास गेले होते. जवळपास 4 वाजताच्या सुमारास वातावरण अचानक बदलले व पावसाला सुरूवात झाली. काही वेळातच गारपीट सुरू झाल्याने वासुदेव शेतातच अडकून पडल्याने गारांपासून आधार घेतला असताना नेमक्या त्याच वेळी अचानकपणे ढगांचा गडगडाट होऊन शेतात विज कोसळली. वीज कोसळल्यामुळे वासुदेव जिटापेन्नेवार ह्यांच्या 22 बकऱ्या, देवराव अरके यांची एक बकरी व मनोज मेनगीनवार यांच्या दोन बकऱ्या जागीच ठार झाला यात शेतमालक वासुदेव जिटापेन्नेवार देखील विजेचा फटका बसल्याने ते सुद्धा खालि कोसळले, यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Web Title: Goats Killed Five Injured Lightning Strike Incident Sondo Vidarbh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :vidarbhadeadSakalStrike
go to top