

Vidarbha News
esakal
गोंदिया: तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हावासींना एप्रिल व मे महिन्यात उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या तर लागतातच, सोबतच बहुतेक गावांना पाणीटंचाईलाही सामोरे जावे लागते. यंदा १५९ गावांत संभाव्य पाणीटंचाई असल्याचे आणि त्यावर उपाययोजना केले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रशासन दरवर्षी उपाययोजना केली जात असल्याचे सांगत असले तरी, ही उपाययोजना केवळ कागदावर राबविल्यात येत असल्याचे पाणीटंचाईवरून दिसून येते.