
गोंदिया : एका महिलेचा खून करून तिच्या सात महिन्याच्या बाळाची विक्री करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (ता. २२) करण्यात आली. अन्नू नरेश ठाकूर (वय २१ रा. भिलाई जि. दुर्ग) असे मृत महिलेचे नाव आहे. यातील मुख्य आरोपीने महिलेचा खून केल्यानंतर तिचा मृतदेह खजरी येथील जंगलात फेकला होता.