Crime News: गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथे रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ. मृत व्यक्ती डोंगरगाव येथील ललित लक्ष्मण येडाम असल्याचे ओळख पटले.
नवेगावबांध ( जि. गोंदिया) : येथील सानगडी मार्गावरील कपील भवनसमोर रस्त्याच्या कडेला बुधवारी (ता. १५) व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली. ही वार्ता गावात पसरली. लोकांनी घटनास्थळी गर्दी केली.