

Gondia News
sakal
रावणवाडी (जि.गोंदिया) : पोटच्या २० दिवसांच्या नवजात बाळाचा जन्मदात्रीनेच वैनगंगा नदीत फेकून खून केल्याचे बुधवारी (ता.१९) पोलिस तपासात उघड झाले आहे. डांगोर्ली येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. रिया राजेंद्र फाये (वय २२, रा. डांगोर्ली ता. जि. गोंदिया) असे आरोपी मातेचे नाव आहे.