ST Bus
sakal
अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) - जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील आदिवासीबहुल दुर्गम तालुका म्हणून अर्जुनी-मोरगाव तालुक्याची शासनदरबारी नोंद आहे. तालुक्याला चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्याची सीमा लागून आहे. ‘गाव तिथे रस्ता’ हे शासनाचे ब्रीद असूनसुद्धा अनेक गावांना जाण्यासाठी पक्के रस्ते नाही. याचा फटका दळणवळणाच्या साधनांनासुद्धा बसतो.