Gondiya : मजितपूर घटनेच्या चौकशीचे पालकमंत्री मुनगंटीवारांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sudhir Mungantiwar

Gondia : मजितपूर घटनेच्या चौकशीचे पालकमंत्री मुनगंटीवारांचे आदेश

गोंदिया : मजितपूर, ता. गोंदिया येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा ट्रकमध्ये बसून प्रवास या घटनेची गंभीर दखल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली असून या घटनेच्या चौकशीचे दिले आहेत. त्याच बरोबर जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांना तात्काळ उपचार मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मजितपूर ता. गोंदिया येथील आश्रम शाळेतील विद्यार्थी क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी कोयलारी येथे गेले होते. स्पर्धा संपल्यानंतर परतीचा प्रवास ट्रकमधून केल्यामुळे काही विद्यार्थ्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचे वृत्त माध्यमात प्रसारित झाले. या घटनेतील विद्यार्थ्यांना उपचारासाठी एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. या वृताची तात्काळ दखल पालकमंत्र्यांनी घेतली असून घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार करावे असे आदेश त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून दिले. पालकमंत्री स्वतः यावर लक्ष देत आहेत. या घटनेची सविस्तर माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली आहे.