ST BUS : एसटी कुणी आणली हो........! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

ST BUS : एसटी कुणी आणली हो....!

गोंडपिपरी : गावखेड्यातील राजकारण म्हणजे लईच भारी.कोण कधी,कुठे,कुणाचा नेम,गेम साधतील शेवटपर्यत पत्ताच लागत नाही.आता तर जि.प.,पं.स. निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत.यामुळ कार्यकर्त्यांत कमालीचा जोश आहे.पट्टे सोशल मिडीयावर जमून भिडलेले आहेत.एसटीचा संप झाला अन बसेस जाग्यावर थांबल्या.जवळपास सहा महिने लालपरी धावली नाही.

संप मिटला अन लालपरी सूसाटपणे मार्गक्रमण करायला लागली.पण गोंडपिपरी धाबा पोडसा या मार्गाची अतिशय दुरावस्था लक्षात घेता महामंडळान या मार्गावर बस न चालविण्याचा निर्णय घेतला.'त्यामुळ या गावातील विशेषत जेष्ट नागरिक व शाळकरी यांना मोठाच फटका बसत होता.मुलांना तर शाळेत यायला खाजगी वाहनांन तिपट्टीन रूपये मोजायला लागायचे.मार्गावरून जातांना रोजच बोंबाबोंब व्हायची.पण काय करणार.दस्तूरखूद वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार,सुभाष धोटे,यांच्यापर्यत हा विषय गेला.

पण परिस्थिती जैसे थे अन शेवटी आज गावात बस आली.अनेक दिवसानंतर बस आल्याचे बघून परिसरातील गावकर्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.सोशल माध्यमातून सरपंच देविदास सातपुते यांच्या प्रयत्नांना फळ मिळाले अन बस सूरू झाली अशी भली मोठी बातमी कार्यकर्तांनी शेअर केली.अन अनेकांनी सातपुतेंवर अभिनंदनाचा वर्षाव केला.तिकडे बस सूरू झाल्याचा आनंद तहसिलदार के.डी.मेश्राम यांनाही झाला.

त्यांनी सातपुते यांच्या प्रयत्नांच्या बातमीला थंम्ब दिला.मग काय भाजपवाले चूप बसतील तर कसे.भाजपचे माजी.जि.प.सदस्य अमर बोडलावार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना लिहीलेल निवेदन व त्यांनी एसटी च्या वरिष्टाःना पाठविलेले पत्र शेअर करित आमच्यामुळ एस टी सूरू झाल्याचे सांगीतले.काँग्रेस कार्यकर्ते सरपंच देविदास सातपुते च्या यशाच्या काँमेन्टस ला थम्ब देऊन बुचकाळ्यात पडलेल्या

तहसिलदार साहेबांना

सगळ्यांचे सामुहिक प्रयत्न असल्याची टिप्पणी लिहावी लागली.प्रयत्न कुणीही केला असेल तरी गावात एसटी सूरू झाली याचा मोठा आनंद सामान्यांना झाला.यानिमीत्ताने राजकीयांच्या श्रेयवादाचेही दर्शन झाले.