esakal | नागपूरकरांसाठी गुडन्यूज! चौराईचे सहा दरवाजे उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नागपूरकरांसाठी गुडन्यूज! चौराईचे सहा दरवाजे उघडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे सहा दरवाजे उघडल्याने तोतलाडोह जलाशयात सोमवारी सायंकाळपर्यंत 80 ते 58 दलघमी पाण्याची वाढ होणार आहे. चौराई धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह जलाशयात सतत पाणी येत असून, जलाशयाची पातळी वाढल्याने नागरिकांच्या चिंतेत घट होण्याची शक्‍यता आहे. दहा दिवसांत तोतलाडोह जलाशयाची पातळी 10 टक्‍क्‍यांनी वाढली.
मध्य प्रदेशात पेंच नदीवर बांधलेल्या चौराई धरणात पाणी अडविल्याने शहरावर जलसंकट सुरू आहे. मध्य प्रदेशात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने चौराई धरणात मर्यादापेक्षा अधिक पाणीसाठा होत आहे. त्यामुळे या धरणातून सतत पाणी सोडले जात आहे. रविवारी चौराई धरणाचे सहा दरवाजे उघडले. चौराई धरणापासून तोतलाडोहचे अंतर 110 किमी आहे. त्यामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत तोतलाडोह जलाशयात पाणी पोहोचणार आहे.
15 ऑगस्टला तोतलाडोह जलाशयात केवळ 2.11 टक्के पाणीसाठा होता. रविवारी (ता. 25) या जलाशयात 12.10 टक्के पाणीसाठा आहे. दहा दिवसांत दहा टक्‍क्‍यांची भर पडली आहे. मध्य प्रदेशात जोरदार पाऊस पडत असल्याने पुढील महिन्यातही चौराईतून तोतलाडोह जलाशयात पाणी येईल, अशी अपेक्षा जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी व्यक्त केली.

loading image
go to top