आनंदवार्ता! आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोहळ्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

नागपूर : गाव समृद्ध करणाऱ्या ग्रामसेवकांचा "आदर्श ग्रामसेवक' पुरस्काराने गौरव करण्यात येतो. पाच वर्षांपासून रखडलेल्या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचा मार्ग मोकळा झाला असून, 2 ऑक्‍टोबरला अर्थात महात्मा गांधी जयंतीदिनी पुरस्काराचे वितरण केले जाईल. एकाच कार्यक्रमात पाचही वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण केले जाईल.

पंचायत समितीस्तरावरून प्रस्ताव कमी-अधिक प्रमाणात येत असल्याने व सरकारने मध्यंतरी पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकांची वेतनश्रेणी कमी केल्याने ग्रामसेवक संघटना व जिल्हा परिषद प्रशासनात मतभेद उफाळले होते. त्यामुळे दरवर्षी हा सोहळा रखडायचा. याबाबत ग्रामसेवक संघटनेने सरकारदरबारी पाठपुरावा करून मागण्या पूर्ण करून घेतल्या. त्यानंतर सीईओ संजय यादव यांचीही भेट संघटनेच्या शिष्टमंडळाने घेतली. आता मध्यम मार्ग काढत सरकारने या पुरस्कार सोहळ्याला हिरवी झेंडी दिली आहे. त्यामुळे ग्रामसेवक कर्मचाऱ्याला दिलासा मिळाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news! Open way for the Ideal Village Service Award Ceremony