आनंदवार्ता! उपद्रव शोध पथकाचे वाढणार बळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

उपद्रव शोध पथकाचे वाढणार बळ
नागपूर : शहरात दुकानदारांकडून कुठेही कचरा टाकणे, घाण करणे आदींवर नियंत्रणासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या उपद्रव शोध पथकाचे बळ वाढणार आहे. उपद्रव शोध पथकातील रिक्त 46 पदे भरण्याबाबत संकेत आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. सध्या उपद्रव शोध पथकात 41 माजी सैनिक आहेत.

शहरात घाण करणारे अनेक मोठे दुकानदार आहेत. याशिवाय प्लॅस्टिक विक्रेते, रस्त्यांवर वाळू, गिट्टी पसरविणारे बिल्डर, घाण करणाऱ्या नागरिकांवर नियंत्रणासाठी महापालिकेने माजी सैनिकांची नियुक्ती करीत उपद्रव शोधपथक स्थापन केले. या पथकासाठी 87 पदे मंजूर करण्यात आली. 2017 मध्ये 56 जणांचा या पथकात समावेश केला. मात्र, उपद्रव शोध पथकाकडून नियमानुसार कारवाई करणे काही नगरसेवकांना रुचले नाही. त्यांनी त्यांचा विरोध केला. एवढेच नव्हे त्यांचा अपमानही केला.
उपद्रव शोध पथकातील स्वाभिमानी माजी सैनिकांना अपमान सहन न झाल्याने त्यांनी नोकरीला रामराम ठोकला.  सध्या उपद्रव शोधपथक सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत काम करीत आहे. तोकड्या मनुष्यबळामुळे पथकाला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे आता 46 पदे भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 3 व 4 सप्टेंबरला या पदांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news! The power of the search team will grow