
मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : मायबापहो एक लुगडं कमी घ्या, पण लेकीबाळांना शिकवा...देव देवळात नाही, तर माणसात आहे...आपल्या कीर्तनवजा भजनातून संत गाडगेबाबा यांनी आयुष्यभर समाजातील अनिष्ट चालीरीतीवर वज्रप्रहार केला. अमरावतीचा रॅपर विपिन तातड याने ‘गोपाला गोपाला’ या रॅप साँगच्या माध्यमातून संत गाडगेबाबांचे विचार युवापिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या सोशल मीडियावर हे रॅप साँग चांगलेच व्हायरल होत आहे.