गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेला ‘खो’!

अनुप ताले
Monday, 2 March 2020

अकोला : शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्‍ध्वस्त होऊ नये, त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडत असून, वर्षभरात प्राप्त 41 अर्जांपैकी 22 अर्ज प्रलंबित ठेवून व दहा अर्ज त्रुटीत काढत, विमा कंपनीकडूनच या योजनेला ‘खो’ दिला जात आहे.

अकोला : शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याचे कुटुंब उद्‍ध्वस्त होऊ नये, त्यांना जीवन जगण्याचे पाठबळ मिळावे, यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली. मात्र योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडत असून, वर्षभरात प्राप्त 41 अर्जांपैकी 22 अर्ज प्रलंबित ठेवून व दहा अर्ज त्रुटीत काढत, विमा कंपनीकडूनच या योजनेला ‘खो’ दिला जात आहे.

जिल्हा कृषी विभागाने योजनेंतर्गत सहभागी झालेल्यांपैकी 41 प्रस्ताव सन 2019 मध्ये विमा कंपनीकडे पाठविले होते. त्यांचेपैकी केवळ सात प्रस्ताव मंजूर झाले असून, 22 प्रस्ताव त्रुटीत काढण्यात आले आहे तर, 10 प्रलंबित ठेऊन, एक नामंजूर करण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षाचा आढावा लक्षात घेता, 167 प्रस्ताव विमा कंपनीकडे जिल्ह्यातून पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी केवळ 60 प्रस्तावच विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आले आहेत. सर्वात महात्त्वाचे म्हणजे, कुटुंबाला पाठबळ मिळेल या अपेक्षेणे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची मात्र, घोर निराशा योजनेतून होताना दिसत आहे.

असा मिळतो लाभ
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत 10 ते 75 वयोगटातील शेतकऱ्यांना सहभागी होता येते. योजनेंर्तगत अपघाती मृत्यू झाल्यास, अपघाताने दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई, एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात पडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, खून, उंचावरुन पडणे, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, जनावरांच्या हल्ल्‍यामुळे किंवा चावण्याने होणारे अपघाती मृत्यू, दंगलीत होणारे मृत्यू, या कारणांनी मृत्यू झाल्यास या विमा योजनेद्वारे विमा योजनेत सहभागी असणाऱ्यांना लाभ दिला जातो. त्यासाठी अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास, निर्धारित केलेल्या संपूर्ण कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्याकडे प्रस्ताव द्यावा लागतो. कंपनीद्वारे शहानिशा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gopinath Munde Farmers accident insurance plan!