esakal | Maharashtra Budget 2021 : अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

बोलून बातमी शोधा

 government medical college will be set up in amravati says ajit pawar maharashtra budget 2021}

गेल्या वर्षीपासून कोरोनाने देशात थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमोडून गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. त्या काळात वेळेवर कोविड सेंटर उभारावे लागले होते. 

Maharashtra Budget 2021 : अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात मोठी घोषणा
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमरावती : ठाकरे सरकारचा आज दुसरा अर्थसंकल्प मांडला जात आहे. त्यामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी आरोग्य विभागासाठी काही घोषणा केल्या आहेत. आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटींची तरतूद करण्यात आले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अत्याधुनिकरण करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील अमरावतीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

हेही वाचा - प्रकल्पग्रस्तांसाठी शासन बनले कठोर; तब्बल ५० वर्षांपासून नोकरीची प्रतीक्षा; एक लाखांवर बेरोजगार 

गेल्या वर्षीपासून कोरोनाने देशात थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमोडून गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. त्या काळात वेळेवर कोविड सेंटर उभारावे लागले होते. यामुळे आता आरोग्य विभागासाठी तरतुद करण्यात आली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय नाहीत, तसेच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, अशा ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. यामध्ये विदर्भातील अमरावतीचा समावेश आहे. त्यामुळे आता अमरावतीमधील नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्याची आशा आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात करीअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासा मिळाला आहे. 

संपादन - भाग्यश्री राऊत