Staff Absence : हिंगणा तालुक्यात ना तलाठी, ना ग्रामसेवक, ना कृषी सहाय्यक; सारेच कार्यालयातून बेपत्ता
Government Workers : हिंगणा तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचार्यांची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकांची गैरहजर असणे शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे.
वानाडोंगरी (ता. हिंगणा) : राज्याच्या उपराजधानीला अगदी लागूनच असलेल्या हिंगणा तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालय प्रमुखांवर कुणाचाच वचक नसल्यामुळे हिंगणा तालुक्यातील जनता कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळली असल्याचे चित्र आहे.