शासनाच्या आदेशाला त्यांनी फासला हरताळ; मुख्यालयाला टाळे; ग्रामसेवक छुमंतर

sironcha
sironcha

 सिरोंचा (जि. गडचिरोली)  :   देशासह राज्यात कोरोनाचे थैमान सुरू असून राज्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आप-आपल्या मुख्यालयी राहून कोरोनासंबधी जागृती करावीे अशी शासनाची कडक सूचना असतानासुध्दा सिरोंचा पंचायत समिती अंतर्गत येणारे अनेक ग्रामसेवक मुख्यलयी न थांबता शासनाच्या आदेशाला खो देत आहेत. मात्र याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक अधिकारी व कर्मचारी आपआपल्या कार्यक्षेत्रात रात्रंदिवस काम करीत आहेत. मात्र सिरोंचा तालुक्यातील पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत येत असलेले अनेक ग्रामसेवक गैरहजर आहेत.  शासनाने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिले असतानासुध्दा सिरोंचा तालुक्यातील ग्रामसेवक मात्र शासनाचा आदेश डावलून मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना कोरोनाविषयी माहिती मिळत नसून नागरिक  अंधारात आहेत.
     ग्रामपंचायत म्हणजे गावाचा विकास करणारी यंत्रणा असून गावाच्या विकासाचा आराखडा ग्रामपंचायतमधून चालतो आणि ग्रामसेवक म्हणजे गावविकासाचे माध्यम होय.असे असतानाही अनेक ग्रामसेवक मुख्यालयी न राहता शासनाच्या आदेशाची पायमल्ली करीत आहेत.

सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी उंदिरवाडे हे रजेवर गेल्याने पंचायत समितीचा कार्यभार बालविकास अधिकारी पटले यांच्याकडे सोपविल्याने पंचायत समिती वाऱ्यावर आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचा धाक नसल्याने अनेक कर्मचारी मनमानी  करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com