सरकार महाराजांचे किल्ले विकायला निघाले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नागपूर : सरकार ओबीसी, एस.सी.,एस.टी. यांना शिक्षण, नोकरीत बाहेर ठेवून जुनी व्यवस्था कायम करण्याच्या प्रयत्न आहे. सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे आता ते किल्ले विकायला निघालेले सरकार आहे,  अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन रॅलीच्या शुभारंभासाठी शहरात आले असताना आंबेडकर म्हणाले की, एमआयएमशी युती अभेद्य आहे. वंचित आणि एमआयएमच्या नेत्यांची बैठक व चर्चा झाली आहे. त्यांच्याकडून यावर जोपर्यंत स्पष्टीकरण येत नाही, तोपर्यंत आमची युती कायम आहे. राहिला प्रश्‍न जागा वाटपाचा, हा विषय गुलदस्त्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
हे सरकार धर्माच्या नावावर सत्तेत आले. जो घटक राजेशाहीत कधील जुळला नाही, त्यांना लोकशाहीत जोडण्यासाठी आरक्षण दिले. त्यांना डावलण्यासाठी हे लोक आरक्षणाचा विरोध करीत आहेत. 50 टक्‍के आरक्षण हे जातीच्या आधारावर आहे. मात्र, सरकार हे तत्त्व बाजूला ठेवत आहे. सेव मेरिटच्या भाषा करणाऱ्यांनी सरकारला "चॉईस एज्युकेशन'चा प्रश्‍न विचारायला पाहिजे, असे ते म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government try to sell fort of Shivaji Maharaj