
अमरावती (परतवाडा) : शंकरबाबा पापळकर यांनी शासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून लवकरात लवकर मार्गी काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी शंकरबाबा पापळकर आणि त्यांच्या १२३ बेवारस दिव्यांग मुलामुलींना आज दिली.