
चंद्रपूर : लोकसंख्या वाढत असल्यामुळे गरजासुद्धा वाढल्या आहेत. या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन पूर्णपणे बिघडले असून आपले भविष्य वाचवायचे असले तर पर्यावरण वाचविणे आवश्यक आहे. त्यासाठी आज आपण पाऊले उचलली तर येणाऱ्या पिढीला आपण चांगले भविष्य देऊ शकतो, असे विचार राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.