राज्यपाल म्हणाले, मातृशक्तीच्या विकासानेच देशाला सुवर्णकाळ येईल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

नागपूर : मातृशक्ती ही भारत देशाची परंपरा आहे. देशातील मातृशक्ती संतुष्ट असली तरी तिचा हवा तसा विकास झालेला नाही. मातृशक्तीचा सर्वांगीण विकास झाल्यावरच देशाला सुवर्णकाळ येईल, असे प्रतिपादन राज्यपाल व कुलपती भगतसिंग कोश्‍यारी यांनी केले. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राच्या वतीने गुरुवारी दीक्षान्त सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विषयाचे चिंतन करताना ते एकाग्री करण्यापेक्षा समग्र होणे अपेक्षित आहे. त्यासाठी आवश्‍यक तो एकात्मतेचा भाव मनात ठेवला पाहिजे. अध्ययन केंद्राद्वारे संपूर्ण विदेशी मापदंडावर संशोधन करण्यात आले आहे. ते भारतीय संस्कृती, परंपरेच्या आधारावर करणेही आवश्‍यक आहे. त्यामुळे ते अधिक प्रभावी ठरेल. संशोधनात अनेक तथ्य बाहेर आले आहेत. ते महत्त्वपूर्ण आहेत. त्यावर विचार करून उपाययोजना व्हाव्यात. आजवर मातृशक्तीची उपेक्षा झाली आहे. या उपेक्षेतही ती "संतोषम परम सुखम' या भावनेतून जीवन जगत आली. मात्र, तिचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासही महत्त्वाचा असल्याचे कोश्‍यारी म्हणाले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Governor said, that with the development of maternal power, the country will come to a golden age