राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य- .प्रकाश आंबेडकर

विवेक मेतकर
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

  • राज्यपालांनी शपथविधीच्या कार्यक्रमाची कल्पना  दिली नाही
  • हे सर्व अचानक घडले नसून दिल्लीतून सुत्र हलली
  • भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून शिवसेनेचा पोपट केला
  • राष्ट्रवादीचे काही नेते  मोदी, अमीत शहा यांच्या संपर्कातच होते

अकोला : तीन पक्षाची आघाडी करण्याच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या हालचालींना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठा धक्का दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच भूकंपासारखे हादरे देणारे निर्णय अजित पवार यांनी घेतले. आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचे राजकीय विश्व त्यांनी हादरवून सोडले. महाविकास आघाडीचे सरकार प्रत्यक्षात येत असल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांचा गड भाजपाला जाऊन मिळाला आणि रात्रीतून सत्तास्थापनेचे सारे चित्रच पालटले. असे असले तरी वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी यात काही नवीन नसल्याचे सांगताना, हे सर्व अचानक घडले असल्याचे ते मानत नसल्याचे सांगितले.  

 

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणतात, ज्या पध्दतीने राज्यपालांनी शपथ दिली.  हे घटनेला धरून नाही. राज्यपालांनी शपथविधीच्या कार्यक्रमाची कल्पना द्यायला पाहिजे होती. लोकांना विश्वासात घेतल्या गेले नाही.  दुसरे म्हणजे, हे अचानक घडले आहे असे मी मानायला तयार नाही. राष्ट्रवादीचे काही नेत्यांची  भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमीत शहा यांच्याशी भेट झाली. दोन दिवसांपूर्वीच राज्यपालांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे पत्र घेवून शरद पवार पंतप्रधान मोदी यांच्यासोबत तास-सव्वातास चर्चा करतात. या भेटी मागिल राजकारण समजून नाही एवढे दुधखुळे आम्ही नाही, असे सुतोवाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. भाजपकडून शिवसेनेचा पोपट होईल, असेही संकेत आंबेडकरांनी दिले होते. त्याचा प्रयत्य दुसऱ्याच दिवशी आला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत मिळून शिवसेनेचा पोपट केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor's decision unconstitutional - Prakash Ambedkar