esakal | शेतकऱ्यांनो! हरभरा नोंदणीला सुरुवात, मिळतोय विक्रमी भाव
sakal

बोलून बातमी शोधा

gram registration begins in yavatmal

सोयाबीन, तूर पाठोपाठ आता हरभऱ्याच्या आधारभूत किमतीने खरेदीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यात पंधरा केंद्रांवर नोंदणी होणार आहे. यात महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे आठ तर विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्या सात केंद्राचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनो! हरभरा नोंदणीला सुरुवात, मिळतोय विक्रमी भाव

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : नाफेडने हरभरा खरेदीला ग्रीन सिग्नल दिला आहे. जिल्ह्यात सोमवारपासून (ता.15) हरभरा नोंदणीला सुरुवात झाली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे सात तर विदर्भ को. ऑपरेटीव्ह मार्केटींग फेडरेशनचे आठ, असे पंधरा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सध्या हरभऱ्याला पाच हजार शंभर रुपये हमीभाव आहे.

सोयाबीन, तूर पाठोपाठ आता हरभऱ्याच्या आधारभूत किमतीने खरेदीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यात पंधरा केंद्रांवर नोंदणी होणार आहे. यात महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे आठ तर विदर्भ मार्केटींग फेडरेशनच्या सात केंद्राचा समावेश आहे. या केंद्रांवर नोंदणीला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत महागाव, आर्णी, पुसद, बाभूळगाव, पांढरकवडा, दारव्हा, नेर, पाटण असे आठ केंद्र निश्‍चित केले आहे. या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली जाणार आहे.

हेही वाचा - Fastag Update : फास्टॅग असूनही भरावा लागला दुप्पट टोल, वाचा काय आहे कारण; टोल नाक्याबाहेर थाटली...

आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत 2020-21 मध्ये नाफेडने खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी झाली नसली तरी येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नोंदणी होण्याची शक्‍यता आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आधारकार्ड, सातबारा उतारा, पिकपेरा तसेच बॅंकेच्या पासबुकची झेरॉक्‍स आदी कागदपत्रं आवश्‍यक आहे. हरभऱ्याला पाच हजार शंभर रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. खासगी बाजारात हमीभावापेक्षा कमी दर हरभऱ्याला आहे. त्यामुळे हमीभाव केंद्रांवर नोंदणी होण्याची शक्‍यता आहे. मात्र, खासगी बाजारात दर वाढल्यास हमीभाव केंद्राकडे शेतकरी पाठ फिरविण्याची शक्‍यता आहे. तूर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. खासगी बाजारात तुरीचे दर सात हजारांवर गेले आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी खासगी बाजाराला पसंती दिली आहे.

आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडमार्फत हरभरा खरेदीसाठी आठ खरेदी केंद्र उघडण्यात आली आहेत. 15 फेब्रुवारीपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी याठिकाणी नोंदणी करावी. 
-अर्चना माळवी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, यवतमाळ.