तिसर्‍या पिढीने साजरा केला 98 वर्षांच्या आजीचा वाढदिवस

buldhana
buldhana

बुलडाणा: 
शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तुझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा शुभं करोति

आई या शब्दात असलेली मायेची ऊब आणि त्यातून व्यक्त होणारा जिव्हाळा हा कवी यशवंतांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.आजही पापण्यांचे दरवाजे मिटले की ती मायेची उब, अलगद अंगावर शहारे उठवुन जाते. तो स्पर्श, मनाला बेकल करतो. आठवणींच्या गावामध्ये, बालपणीच्या रानामध्ये, मिश्कील हरकतींच्या किलबिलाटामध्ये आपण नकळत ठाण मांडतो.आज समाजामध्ये मोठ्याप्रमावर विभक्त कुटुंब पद्धतीचे जिवन जगण्याकडे कल वाढला आहे. यामुळे परिवारातील वृद्धांची मोठी गोची निर्माण होते. परंतु, या सर्व गोष्टींना फाटा देत बुलडाणा शहरातील महावीर नगरात शिराळे कुटुंबीयांनी आज (ता.14) तिसर्‍या पिढीने आजीचा वाढदिवस करत समाजामध्ये एक आदर्शवत संदेश प्रस्थापित केला आहे. 

आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार्‍यांच्या सध्याच्या युगात आजही एकत्रित कुटुंब पद्धतीची नाळ आई कायम ठेवली आहे. जन्म देण्यापेक्षा घडविणारा मोठा असतो. रझीयाबाई उर्फ राधाबाई शिराळे याचा जन्म 14 जून 1921 मध्ये चिखली येथे झाला. माहेर, सांसर आणि जन्म हा चिखली शहरातच गेला. राधाबाईना एकूण 9 अपत्य. सक्रुजी शिराळे हे अहिरवाल चर्मकार समाजातील शैक्षणिक पात्रतेवर नोकरी करणारे पहिले व्यक्ती होते. तुटंपूज्या पगारात कुटुंबांचा रडाटगाडा चालवीत आई राधाबाई यांनी 9 पैकी 8 मुलांचे शिक्षण केले. आजरोजी 7 अपत्ये हयात असून, शिराळे कुटुंबीयांत एकूण 31 नातू, 57 पणतू व 15 नातीचे नात असा एकूण 110 च्या मुलांमुलींकडील कुटुंबीयांचा गोतावळा आहे. आईच्या वाढदिवसाची सुरवात ही शिक्षक मुलगा असलेल्या दशरथ शिराळे यांनी 1995 मध्ये सर्वप्रथम केली. कालातंराने त्यांचे निधन झाले परंतु, उर्वरित भावंडांनी मोठ्या भावाचा आदर्श कायम ठेवत आजही वाढदिवस साजरा करण्याची परंपरा अविरत सुरू ठेवली आहे. स्वत: अशिक्षित असलेल्या आईंनी मुलांसाठी झीज स्विकारुन शिक्षण दिले.

आजच्या समाजात वृद्धांना सन्मानजनक वागणूक न देता थेट वृध्दआश्रमाचा दरवाजा दाखविण्याचे अनेक उदाहरणे आहे. परंतु, शिराळे कुटुंबीयांनी सातत्याने एकजुटी कुटुंब ठेवत आईचा वाढदिवस हा मर्यादीत न ठेवता तो सार्वजनिक पद्धतीने साजरा करुन समाजाला एक वेगळा संदेश दिला आहे. विशेष म्हणजे 99 वर्षांत पर्दापण केलेल्या राधाबाई यांचे दात कायम असून, त्या कोणत्याही प्रकारचे औषध घेत नाही. चालताना काठीचा उपयोग नाही. कुटुंबीयांनी वेळोवेळी त्यांची घेतलेली काळजी हीच त्यांच्या वाढत्या वयात एकप्रकारे औषधींचे काम करत आहे. आज कुटुंबीयांत मोठा मुलगा भीमसेन शिराळे, छगनलाल शिराळे, कपूरचंद शिराळे धूरा सांभाळत आहे. तर, मुली कासाबाई खरात, रुपाबाई कडाळे, दुर्गाबाई शिंगणे, कमलबाई शिंपे सदैव आईची काळजी करत आहे.  शेवटी कुटुबांतील सदस्य सांगता तिन्ही जगाचा राजा, आईविना भिकारी..त्यामुळे शिराळे कुटुंबांची नाळ बांधू ठेवण्याचे काम केले आहे. 

आईने नेहमी प्रमाणिकपणाने वागा आणि कष्ट करा एक दिवस नक्की तुम्हाला फळ मिळले ही शिकवण दिली आहे. कुटुंबांत आज प्रत्येक व्यक्ती चांगली सून पाहिजे, चांगला जावई पाहिजे अशी अपेक्षा ठेवता. परंतु, दुसर्‍याच्या घरी जात असताना आपण आपल्या मुलीला चांगले संस्कार द्या आणि चांगला जावई नक्कीच मिळेल. नेहमीच आपल्या स्वभावात शांतता आणि एकजुटीने रहा अशी शिकवण दिली. आईच्या शिकवणीमुळे आज सर्व सुखात आहे.
- भीमसेन शिराळे, बुलडाणा. 

अनेक कुटुंबात आई- वडिलांना न सांभाळ करणारे मुले आहे. यासाठी शासनाला चक्क कायदा करण्याची गरज पडली आहे. परंतु, शिराळे कुटुंबीयांनी आदर्श निर्माण करुन या समाजात आई- वडिलांच्या उपकाराची एक भेट दिली आहे. आजच्या युवा पिढीने याचा आदर्श घेण्याची गरज आहे. 
- शालिनी बुंधे, औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com