Yavatmal News: दारव्हा रेल्वे खड्ड्यात बुडून चार चिमुकल्यांचा मृत्यू; नातवाच्या दु:खाने आजोबांचा हृदयविकाराने मृत्यू
Heart Attack: दारव्हा रेल्वे खड्ड्यात चार मुलांचे बुडून मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातवाच्या मृत्यूस शोकलेल्या आजोबांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अंत्यसंस्कार गुरुवारी करण्यात आले.
दिग्रस : दारव्हा येथे बुधवारी (ता. २०) रेल्वेच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला. नातवाच्या मृत्युमुळे अस्वस्थ झालेल्या आजोबांचाही रात्री मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दिग्रस येथे घडली.