
मोताळा (जि. बुलडाणा) : शेती व पेन्शनची अर्धी रक्कम नावावर करून देण्यासाठी ३० वर्षीय नातवाने ७५ वर्षीय आजीचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना गोसिंग येथे उघडकीस आली. अंजनाबाई ओंकार सुरळकर असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी आरोपी नातूविरुद्ध बुधवारी (ता. ६) रात्री गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.