
पुसद (जि. यवतमाळ) : अलीकडे शहर विभागात लग्न म्हणजे इव्हेंट. डीजे, संगीत, नृत्य, फटाक्यांची आतषबाजी आणि खाद्यपदार्थांचा चमचमीत मेनू. परंतु, गाव खेड्यात अजूनही ग्राम संस्कृती जीवंत आहे. त्याची चुणूक गुरुवारी (ता. २९) कन्हेरवाडीत दिसून आली. वृक्ष चळवळीत पुढाकार घेणाऱ्या पर्यावरणप्रेमी नवरदेवाने ’आधी वृक्षारोपण, नंतरच लग्न बंधन’ या वचनाची पूर्र्ती करीत समाजासमोर नवीन आदर्श ठेवला.