Ramtek News : झोपडीत पोरगं सांभाळायचं का प्रशासनाचा त्रास? हिवरा (भेंडे) येथील महिलेच्या झोपडीवर वीज तारांचे लटकते संकट
Rural Struggles : हिवरा (भेंडे) येथील सुकेसनी मेश्राम या विधवा महिलेचे घर स्लॅबशिवाय अपूर्ण आहे. वरून गेलेल्या वीजतारेमुळे काम थांबले असून, आठ महिन्यांपासून निवेदन दिले तरी प्रशासनाकडून काहीच हालचाल नाही.
रामटेक : मी पोराला शिकवू की त्याचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर जागत राहू, हा प्रश्न विचारणारी सुकेसनी मेश्राम हिवरा (भेंडे) गावात एका अर्धवट घरकुलाच्या मागे असलेल्या तुटक्या झोपडीत आपल्या लहानग्या मुलासह राहत आहे.