मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला ‘झेंडा मंत्री’ अनुपस्थित! नागरिक कोणाला म्हणतात झेंडा मंत्री वाचा...

Guardian Minister Vishwajeet Kadam is absent during the Chief Ministers visit
Guardian Minister Vishwajeet Kadam is absent during the Chief Ministers visit

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी काॅंग्रेसचे उमरेड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू पारवे आणि काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई उपस्थित होते. परंतु, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम मात्र आले नाही. त्यामुळे कार्यक्रमस्थळी विविध चर्चा सुरू होत्या.

शुक्रवारी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येथे असल्यामुळे पालकमंत्री येतील, अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण, आजही न येऊन त्यांनी आमचा भ्रमनिरास केला, असे लोक गोसेखुर्द धरण परिसरात बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्यात काॅंग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे, तुमसरचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार राजू कारेमोरे आणि काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई पूर्ण वेळ उपस्थित आहेत.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे प्रतिनिधीत्व येथे होते. परंतु, पालकमंत्री विश्वजित कदम यांची अनुपस्थिती अनेकांना खटकली. यामध्ये महाविकास आघाडीतील काही वाद नसून मुख्यमंत्र्यांचा दौरा अगदी वेळेवर ठरल्यामुळे ते आले नसावे, असाही कयास काहींनी लावला. यासंदर्भात विश्वजित कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता `त्यांनी उत्तर दिले नाही`.

डीपीसीच्या बैठकीशिवाय आलेले नाही

राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले तेव्हापासून या जिल्ह्यात फक्त झेंडा फडकवायला आणि डीपीसीच्या बैठकीशिवाय आलेले नसल्याचे येथील नागरिक सांगतात. त्यामुळे भंडारा जिल्ह्याचे लोक त्यांना झेंडा मंत्री संबोधतात.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com