
गुमगाव : ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक समृद्धतेचा वारसा लाभलेली गुमगावनगरी स्वातंत्र्यासाठी लढताना प्राणार्पण करणाऱ्या वीर हुतात्म्यांनी अजरामर केली. स्वातंत्र्यासाठी लढताना या गावातील चार क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती देत हौतात्म्य पत्करले. आजही त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून उभे आहे.