

घुग्घूस : शहरात रविवारी रात्री आठच्या सुमारास अचानक तणावाचं वातावरण निर्माण झालं, जेव्हा अज्ञात हल्लेखोरांनी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या घरावर गोळीबार केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गोळीबारानंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.