पथ्रोट : सकाळपासूनच कडक ऊन तापत असताना अचानकपणे शनिवारी (ता. १२) दुपारी पथ्रोट येथे साबुदाण्याएवढ्या आकाराच्या गारांचा पाऊस पडल्याने काही अंशी का होईना नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला..यावर्षी एक महिना आधीपासूनच उन्हाळ्याची चाहूल जाणवली.अशातच लोकांच्या घरोघरी आता गारवा निर्माण करणारे कुलर लागल्याचे दिसून येत आहे.मागील काही दिवसांपूर्वी विदर्भासह महाराष्ट्रातील काही शहर व ग्रामीण भागात पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता. .त्यानुसार त्या त्या ठिकाणी वादळवाऱ्यासह पाऊस सुरू असून काही ठिकाणी शेतातील पिकांना त्याचा फटका बसलेला दिसून आला आहे. शनिवारी दुपारी २ वाजून ४० मिनिटांच्या दरम्यान अचानकपणे ढगांचा कडकडाट होऊन पावसाला सुरवात झाली..Women Empowerment : साडेतीनशे सरपंचपदांवर ‘महिलाराज’ .पंधरा ते वीस मिनिटे सुरू राहिलेल्या या पावसात अतिवेग नव्हता, तरीसुद्धा साबुदाण्याच्या आकाराएवढी गार पडल्याने हवामानात बदल दिसून आला. तर रस्त्यावर पडत असलेल्या गारा जमा करण्याचा काही नागरिकांना मोह आवरता आला नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.