
शेगांव: तालुक्यातील कालवड, बोंडगांव, कठोरा, भोनगांव यासह एकूण अकरा गावांमधील ग्रामस्थांमध्ये मागील काही दिवसांपासून केसगळतीच्या समस्या आढळून आली आहे. तीन दिवसांतच नागरिकांचे टक्कल पडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. या अकरा गावांमधील १०० रुग्ण केसगळतीने बाधित असल्याचे आढळून आले, अशी माहिती शेगावचे तहसीलदार दीपक बाजड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवली आहे.