esakal | निम्म्या शहरात उद्या पाणी बंद
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

निम्म्या शहरात उद्या पाणी बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या जलवाहिनीला वर्धमाननगर येथे गळती लागली असून, 27 ऑगस्टला दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. याशिवाय कन्हान जलशुद्धीकरण केंद्र परिसरात उच्चदाब वाहिनी टाकण्याचे काम करण्यात येईल. त्यामुळे मंगळवारी पाच झोनमधील वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
कन्हान जलशुद्धीकरण केंद्र ते शहरापर्यंत येणाऱ्या जलवाहिनीला वर्धमाननगरात गळती आढळून आली. या गळती दुरुस्तीसह सुभाननगर जलकुंभाच्या इनलेट व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात येईल. त्यामुळे 27 ऑगस्टला 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कामामुळे नेहरूनगर झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन, आशीनगर झोन व मंगळवारी झोनमधील काही भागांत पाणीपुरवठा होणार नाही. वीज वाहिनी टाकण्यात येणार असून, इतर केबल्सच्या दुरुस्तीचीही कामे करण्यात येणार आहे. या कामादरम्यान जलकुंभातही पाणी भरले जाणार नाही. त्यामुळे टॅंकरनेही पाणीपुरवठा होणार नसल्याचे ओसीडब्ल्यू, मनपाने कळविले आहे. नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन मनपाने केले आहे.
 

loading image
go to top