पैशाचे आमिष दाखवून तो चक्क ४० वर्षीय विवाहितेला म्हणाला... वाचा सविस्तर

file photo
file photo

अमरावती : काही टवाळखोर तरुण मुले नेहमीच विवाहित महिला, तरुणींच्या अब्रूशी खेळण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातून त्यांना समाधान मिळ असले; तरी त्या घटना महिलांसाठी त्रासदायक ठरत आहेत. याची दखल पोलिस तक्रारीनंतर घेत आहेत. मात्र अशा घटना वारंवार घडत असतात.

टवाळखोर मुले नेहमीच विवाहित महिला, युवतींच्या छेडखानीसाठी वेगवेगळे फंडे वापरतात. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तिला त्रास देण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या घटना उजेडात येत असतात.

आरोपीने केला महिलेचा पाठलाग

अमरावती जिल्ह्यातील धामणगावरेल्वे तालुक्‍यातसुद्धा एका 40 वर्षीय विवाहित महिलेचा एका संशयित आरोपीने पाठलाग करून, मला हवे ते दे... अशी मागणी घालून तिची छेडखानी काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मंगरुळदस्तगीर ठाण्यात याप्रकरणी संशयित आरोपी संदीप ढेवले (वय 25 रा. नायगाव) याच्या विरुद्ध पाठलाग करून महिलेची छेडखानी केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

विचित्र मागणी केल्याने महिलेला धक्का

धामणगावरेल्वे तालुक्यातील एक पीडित महिला आपल्या चिमुकल्या पुतण्यासह धान्य घेण्यासाठी एका सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानात गेली होती. त्याठिकाणी संशयित संदीप ढवलेने तिला बघून अश्‍लील इशारे केले. त्यानंतर तिच्याशी बोलून पाचशे रुपयांचे आमिष दाखविले. ‘मला हवे ते दे... असे बोलून पीडितेच्या मनाला धक्का पोचेल, अशी विचित्र मागणी केली. त्यामुळे महिला भीतीग्रस्त झाली.


अखेर घरातून हाकलून लावले

थोड्या वेळानंतर पीडित महिला ही धान्य घेऊन आपल्या घरी परतली असता, त्याच दिवशी सकाळी पावणे अकराच्या सुमारास संदीपने तिचे घर गाठले. पुन्हा सरकारी स्वस्त धान्य दुकानासमोर केले तसेच असभ्य वर्तन तिच्या घरी जाऊनसुद्धा केले. त्याने पीडितेशी बळजबरी करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. त्यानंतर तिला शिवीगाळही केली. तिने मदतीसाठी आरडाओरड करून संदीपला घरातून हाकलून लावले.


पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

अखेर पीडितेच्या तक्रारीवरून मंगरुळदस्तगीर पोलिसांनी आरोपी संदीपविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकीसह, ॲट्रॉसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांनी दखल घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने महिलेच्या जिवात जीव आला.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com