बडतर्फ मुख्याध्यापकाने संस्थाचालकावर चढवली चारचाकी

बडतर्फ मुख्याध्यापकाने संस्थाचालकावर चढवली चारचाकी
Updated on
देवलापार : मुख्याध्यापकाला संस्थेने बडतर्फ केल्याने चिडलेल्या मुख्याध्यापकाने थेट संस्थाचालकावर चारचाकी चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर गाडीच्या धक्‍क्‍याने खाली पडलेल्या संस्थाचालकावर रॉडने हल्ला केला. संस्थाचालकाचे नाव विष्णुपंत किंमतकर असून आरोपी बडतर्फ मुख्याध्यापकाचे नाव अशोक सातपुते आहे. ही घटना सोमवारी (ता. 26) दुपारी बाराच्या सुमारास घडली.
संस्थाचालक विष्णुपंत किंमतकर व मुख्याध्यापक अशोक सातपुते यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. हा वाद विकोपाला गेला असून संस्थेने मुख्याध्यापकावर भ्रष्टाचाराचेही आरोप करीत बॅंकेतून रक्कम उचल केल्याचेही आरोप लावले. दरम्यान, 14 ऑगस्टला मुख्याध्यापक सातपुते यांना माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. एस. एन. पटवे यांनी बडतर्फ केले. ज्येष्ठ शिक्षक अशोक ढपकस यांना मुख्याध्यापकाचा कार्यभार घेण्याचे आदेश दिले. यावरून वाद पुन्हा चिघळला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी डॉ. विष्णुपंत किंमतकर, संस्थेचे पदाधिकारी, गावातील सरपंच मंजूषा मोहनकर, उपसरपंच रोशन राऊत, पोलिस पाटील, छाया वाहाने व अनेक पालक व शिक्षक पाऊस नसल्याने शाळेतील स्टेजसमोर बसले होते. इतक्‍यात आरोपी अशोक सातपुते यांनी त्यांची चारचाकी बसलेल्यांच्या दिशेने आणली. गाडीची गती पाहून सर्व सैरावैरा पळू लागले. सातपुतेंचा रोष संस्थाचालकांवर असल्याने त्यांनी त्या दिशेने गाडी वळविली व डॉ. किंमतकर यांना धडक दिली. ते ओट्यावरून उडाले, गाडी ओट्यावर जाऊन धडकली. त्यानंतर सातपुते व त्यांच्या काही साथीदारांनी संस्थाचालकांना रॉडने मारहाण केल्याचे पोलिसांत नमूद आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com