
चिखली : शहरातील मच्छी मार्केट परिसरात मांस व चिकन विक्री करणाऱ्या काही व्यसायीकांकडून सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेच्या नियमांना ठोसा देणारी कृत्ये उघडकीस आली आहेत. हे विक्रेते मांसाचे तुकडे, अवशेष कचरापेटीत न टाकता थेट डीपी रोड परिसरात उघड्यावर फेकत आहेत. या प्रकारामुळे जैविक प्रदुषण वाढत असून परिसरात दुर्गंधी मुळे सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांच्या आरोग्य धोक्यात आले आहे.