वलगावात अनेकांना मास्क न वापरणे पडले महागात

संतोष ताकपिरे
Sunday, 20 September 2020

कोरोनाला रोखण्यासाठी सध्या मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळण्यांविरुद्ध प्रत्येक शहरांत कठोर कारवाई करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातही अशी कारवाई करण्यात येत आहे.

अमरावती : कोरोनाला रोखण्यासाठी सध्या मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळण्यांविरुद्ध प्रत्येक शहरांत कठोर कारवाई करण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यातही अशी कारवाई करण्यात येत आहे.

पोलिस आयुक्तांच्या आवाहनानंतर मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणाऱ्यांविरुद्ध सर्वाधिक कारवाई ही वलगाव ठाण्याच्या हद्दीतच होत आहे. मुख्य बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी नियम मोडणाऱ्यांना सूट दिल्या जात असल्याचे चित्र बघायला मिळाले. शुक्रवारी एकट्या वलगाव ठाण्याच्या हद्दीत कामुंजा व रेवसा परिसरात दहा कारवायांमध्ये एकूण बारा जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले. कामुंजात शेख इमरान शेख साबीर, रेवसात संजय सुखदेव शिरसाठ, प्रमोद भाऊराव पचारे, सचिन प्रकाश चांगोले, संतोष लक्ष्मण भांगे, निरंजन महादेव भांगे, सुमित विलास भालचक्र, शिरीष गोपाळ इंगोले, बबलूशॉं बशीरशॉं, बबलू ऊर्फ श्रीकांत नारायण वाकोडे, नितेश नारायण पुरी, विवेक विलास गणोरकर आदींविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

वाचा - याला म्हणतात आत्मविश्वास! फेरमूल्यांकनात जुळ्यांचे गुण ‘सेम टू सेम'; दहावीच्या निकालात दुसऱ्या स्थानावर

भातकुली पालिसांनी येथील बसस्थानक परिसरात बेसावध फिरणाऱ्या ज्ञानेश्‍वर भानुदास कोलटेके विरुद्ध कारवाई झाली. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत वडाळी नाक्‍यावर सोमेश्‍वर गुरड, परमेश्‍वर किसन भटकर या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. महत्त्वाची बाब म्हणजे मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना पोलिसांसोबत अनेकांनी वाद घातल्याचे दृश्‍य बघायला मिळाले. महत्त्वाची बाब म्हणजे शहरात शहर कोतवाली, गाडगेनगर, राजापेठ, बडनेरा, नागपुरीगेट, खोलापुरीगेट परिसरात अत्यंत वर्दळीचा भाग आहे. सर्वाधिक बाजारपेठ, गर्दी याच ठाण्याच्या हद्दीत दिसते. परंतु नियमही याच भागात मोडल्या जात असतानाही कारवाई होत नाही, हे विशेष.  

संपादन - नरेश शेळके

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Fine in Walgaon for not Wearing Mask