esakal | मेळघाटात जोरदार पाऊस; 50वर गावांचा संपर्क तुटला
sakal

बोलून बातमी शोधा

धारणी : धूळघाट येथील मोठ्या पुलाजवळून वाहत असलेले पाणी.

मेळघाटात जोरदार पाऊस; 50वर गावांचा संपर्क तुटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारणी (जि. अमरावती) : मेळघाटात मंगळवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धारणी तालुक्‍यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला आहे. धुळघाट रोड या गावात पूर आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या गावातील सुरक्षाभिंतीला पाण्याने वेढलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. दिया व उतवली या गावाजवळील सिपना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे बैरागड रस्त्यावरील 30 गावांचा संपर्क तुटलेला आहे. राणीतंबोली येथेही सिपना नदी रौद्र रूप धारण करून वाहत आहे. त्यामुळे राणीतंबोलीजवळील गावांचा संपर्क तुटला आहे. सिपना नदी रोहणीखेडा या गावाजवळून वाहते. या गावातील पुलावरून पाणी वाहत असल्याने पुढील 30 गावांचा संपर्क मुख्यालयाशी तुटला आहे.
तहसीलदारांनी दिला सुरक्षितेचा इशारा
धारणी येथे मुसळधार पाऊस सुरू असून गडगा व सिपना नद्यांवरील मुख्य पूल पाण्याखाली आल्याने सर्व नागरिकांनी सुरक्षितस्थळी थांबावे. तसेच कोणतीही मदत हवी असल्यास तहसील कार्यालय धारणी येथे संपर्क करावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.

loading image
go to top