esakal | आज-उद्या मुसळधारेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

आज-उद्या मुसळधारेचा इशारा

आज-उद्या मुसळधारेचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : बाप्पाच्या आगमनाच्या पावन पर्वावर शहरात सोमवारी वरुणराजाने जोरदार हजेरी लावली. सकाळी काही भागांत संततधारेनंतर सायंकाळी जोरदार पाऊस बरसला. नागपूर वेधशाळेने पुढील दोन दिवस मुसळधारेचा इशारा दिला असून, विदर्भात पावसाचा मुक्‍काम आठवडाभर राहण्याची शक्‍यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या मध्य भारतावर ढगांची दाटी झाली आहे. उपराजधानीत सकाळपासूनच रिमझिम सुरू झाली. दुपारी बारा-एकपर्यंत अनेक भागांत संततधार बरसला. दुपारच्या "ब्रेक'नंतर सायंकाळी पुन्हा धो-धो बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची विशेषत: गणेशभक्‍तांची तारांबळ उडाली. भर पावसातही नागपूरकरांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विदर्भातील ब्रह्मपुरी (45.4 मिलिमीटर), गडचिरोली (44.2 मिलिमीटर), बुलडाण्यासह (23 मिलिमीटर) इतरही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. हवामान विभागाचा इशारा आणि सध्याचे अनुकूल वातावरण लक्षात घेता वरुणराजाचा किमान आठवडाभर विदर्भात मुक्‍काम राहण्याची शक्‍यता आहे.
loading image
go to top