
वाशीम : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मूसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाने पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर आहे आहे. पुराच्या पाण्याने नदी, नाल्या काठची शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके वाहून गेली आहेत. परिणामी हिरव्या शेतात दगड गोटे साचले आहेत. अनेक ठिकाणी नाले शेतात घुसल्याने पिकांची मोठी हानी झाली.