esakal | सावधान! विदर्भातील पावसाबाबत हवामान विभागाने दिले हे गंभीर संकेत.. वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rainfall in vidarbh region till next week

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, येत्या नऊ ऑगस्टच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, तो छत्तीसगड, मध्य प्रदेशमार्गे विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सावधान! विदर्भातील पावसाबाबत हवामान विभागाने दिले हे गंभीर संकेत.. वाचा सविस्तर

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर:  संपूर्ण जुलै महिना  विदर्भासह नागपूर जिल्हा अक्षरशः कोरडा होता. काही ठिकाणी आलेला तुरळक पाऊस वगळता अनेक जिल्हे तहानलेलेच होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढताना दिसतो आहे. नागपूरसह विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाबद्दल हवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.   

हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, येत्या नऊ ऑगस्टच्या आसपास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, तो छत्तीसगड, मध्य प्रदेशमार्गे विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या तीव्र प्रभावामुळे नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. 

हेही वाचा - अमरावतीत खळबळ! खासदार नवनीत राणा पॉझिटिव्ह!

पुढचे इतके दिवस पाऊस 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे विदर्भात आणखी आठवडाभर पावसाचा मुक्काम राहण्याची दाट शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने तसे संकेत दिले आहेत. सध्याचे वातावरण लक्षात घेता पुढील तीन-चार दिवसही विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. त्यामुळे एकूणच हा संपूर्ण आठवडा पावसाचा राहणार आहे.

शहरात पाच दिवसांत 203 मिमी

विदर्भातील अनेक जिल्हे अद्याप तहानलेले असले तरी, नागपूर शहरावर वरुणराजाची चांगलीच कृपादृष्टी होत आहे. शहरात ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंतच्या पाच दिवसांत तब्बल 203 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुधवार व गुरुवारच्या रात्रीही 47.2 मिलिमीटर पाऊस बरसला. उल्लेखनीय म्हणजे नागपुरात 1 जूनपासून आतापर्यंत तब्बल 859 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा सरासरीच्या (943 मिलिमीटर) जवळपास 90 टक्के पाऊस आहे.

नक्की वाचा - प्रेमाखातर स्वीकारला मुस्लीम धर्म अन् झाली दोन मुलांची आई, तरीही प्रेम विवाहाचा करुण अंत

धनपट्ट्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा

गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या धनपट्ट्यातही पावसाने दमदार पाऊस सुरू असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. चंद्रपूरचा वगळता तीन जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाल्यामुळे रोवण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गोंदिया जिल्ह्यात सरासरीच्या 43 टक्के कमी पाऊस पडलेला आहे. भंडारा व गडचिरोली येथेही अनुक्रमे 21 व 24 टक्के कमी पाऊस झालेला आहे. गोंदिया जिल्ह्यात काल विदर्भात सर्वाधिक 62.4 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top