
बुलडाणा : मेहकर, लोणार, चिखली व बुलडाणा तालुक्यांमध्ये २६ जूनला सकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली. २३ मंडळांचा यामध्ये समावेश होता. २६ जूनच्या सकाळी नऊ वाजेपासून कांचनगंगा नदीला महापूर आल्याने मुंबई-नागपूर महामार्ग बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.