Monsoon Damage: चाळीस दिवसांत पावसाचे पश्चिम विदर्भात नऊ बळी; ८४ हजार हेक्टर क्षेत्रातील खरिपाची पिके बाधित
Vidarbha Rain Impact: जून-जुलैच्या पावसात विदर्भात आठ जणांचा मृत्यू झाला असून ८४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जीवित व शेतीहानी झाली आहे.
अमरावती : जून व जुलै महिन्यात झालेल्या पावसाने अमरावती विभागातील आठ जणांचा बळी गेला आहे. तब्बल ८४ हजार ८८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून ७ हजार ४४५ हेक्टर क्षेत्र गाळ साचल्याने खराब झाले आहे.