esakal | श्रावण संपताच यवतमाळ जिल्ह्यात दमदार पाऊस
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

श्रावण संपताच यवतमाळ जिल्ह्यात दमदार पाऊस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : श्रावण महिना संपताच पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. "पोळा आणि पाऊस होतो भोळा' असे म्हटले जाते. असे असले तरी पोळ्याच्या दिवसापासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे.
दीर्घ विश्रांती घेणाऱ्या व रिपरिप बरसणाऱ्या पावसाने शेतकरी समाधानी असला तरी प्रकल्पात पुरेसा जलसाठा झाला नाही. शुक्रवारी (ता.29) श्रावणमास संपला आणि याच दिवशी पावसाने सायंकाळी दमदार हजेरी लावली. भरपावसातही नागरिकांची पोळ्यात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी (ता.31) रात्री जोरदार पाऊस कोसळला. रविवारी (ता.1) सकाळी रिपरिप पाऊस झाला. शनिवारी सरासरी 225 मिलीमीटर पाऊस कोसळला. सर्वाधिक नेर तालुक्‍यात 30 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल आर्णी 23, यवतमाळ 17, पुसद 17, महागाव 17, राळेगाव 17, दारव्हा 15, घाटंजी 13, केळापूर 12, झरी जामणी 11, उमरखेड 10, बाभूळगाव 9, आर्णी 8, वणी 8, कळंब 8, दिग्रस 7 आणि मारेगाव तालुक्‍यात सर्वांत कमी चार मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ 46 टक्के पर्जन्यमान झाले आहे. पावसाने सातत्य कायम ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रकल्पातील जलसाठा वाढला
रिपरिप होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघुप्रकल्पांतील जलसाठा काही प्रमाणात वाढला आहे. पूस प्रकल्पात 40 टक्के, अरुणावती 12, बेंबळा 83, गोकी 51, वाघाडी 52, बोरगाव 76, अधर पूस 90 तर अडाण प्रकल्पात आठ टक्के जलसाठा आहे. नवरगाव व सायखेडा प्रकल्प यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले आहेत.

loading image
go to top