अमरावतीकरांनो, तुमच्या चोरी केलेल्या मोटारसायकल सापडल्या 

motorcycle thief
motorcycle thief
Updated on

अमरावती : गत वर्षभरात शहरातून साडेतीनशेच्यावर दुचाकी चोरीस गेल्या. यामुळे पोलिस हैराण झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर चार दिवसांपूर्वी शहर कोतवाली पोलिसांनी 24 व बुधवारी (ता. आठ) राजापेठ पोलिसांनीही तब्बल पंचवीस अशा एकूण 49 दुचाकी या आठवड्यात जप्त केल्या. 

नववर्षातील मोठी कामगिरी 

नव्या वर्षात शहर पोलिसांनी केलेले हे सर्वांत मोठे डिटेक्‍शन आहे. राजापेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांनी प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. राजापेठ पोलिसांनी चार दुचाकी चोरांना अटक केल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. परंतु रेकॉर्डवरील केवळ दोघा चोरांची नावे पहिल्या टप्प्यात अधिकाऱ्यांनी सांगितली. 

दोन चोरट्यांना केली अटक 

अनिल ऊर्फ सागर सदानंद वानखडे (वय 24, रा. सांगळूद, दर्यापूर) व निखिल दुर्योधन काळे (वय 25, रा. काटआमला, भातकुली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी या दुचाकी राजापेठ, बडनेरा, कोतवाली आणि वलगाव ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. या दोघांनी चोरीच्या दुचाकी पूर्णानगर येथील नसीम इलियास खान सौदागर व कुणाल सुभाषसिंग तोमर (ठाकूर) यांना विकल्या. त्यानंतर नसीम व कुणाल यांनी चोरीच्या दुचाकींची विल्हेवाट लावली. पहिल्यांदाच चोरी करणारे दोघे पोलिसांच्या हाती सापडले. 

चोरीच्या दुचाकींची विल्हेवाट लावणारे मोकाटच 

चोरीच्या दुचाकींची विल्हेवाट लावणारे नसीम व कुणाल यांना अद्याप अटक झालेली नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात राजापेठच्या डीबी स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक दत्ता नरवडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रंगराव जाधव, किशोर अंबुलकर, राजेश गुरेले, फिरोज खान, छोटेलाल यादव, दिनेश भिसे, अख्तर पठाण, नईम बेग आणि नीलेश पोकळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पत्रपरिषदेला उपायुक्त शशिकांत सातव, यशवंत सोळंके, सहायक पोलिस आयुक्त सुहास भोसले उपस्थित होते. 

अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मिळणार बक्षीस 

नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात कोतवाली व राजापेठ पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा छडा लावून त्यातील दोघांना अटक केली. या कामगिरीबद्दल संबंधित पोलिस अधिकारी आणि पोलिस शिपायांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत केली.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com