esakal | पिस्तुलाच्या धाकावर दारू व्यापाऱ्याचे अपहरण
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

पिस्तुलाच्या धाकावर दारू व्यापाऱ्याचे अपहरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अंबाझरीतील एका दारूविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्याचे तीन कुख्यात गुंडांनी पिस्तुलाच्या धाकावर अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी दहा लाख रुपयांची खंडणी उकळली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रशांत बजरंग आंबटकर असे अपहरणकर्त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ऑगस्टला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास प्रशांत आंबटकर (36, रा. मनीषनगर) हे
त्यांच्या दुचाकीने दारूच्या दुकानात जाण्याकरिता घरून निघाले होते. अंबाझरी हद्दीतील शंकरनगर चौक ते रामनगर चौकाकडे जाणाऱ्या रोडवर कारमधून आलेल्या आरोपी गुलामनवाज शेखू खान, सूरज चौधरी, शिवा व त्याच्यासोबत असलेल्या काही साथीदारांनी त्यांना अडविले आणि दुचाकीवरून उतरवून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणीच्या उद्देशाने पूर्व नियोजित कट रचून अपहरण केले. अज्ञात ठिकाणी नेल्यानंतर आरोपींनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याचे धमकी दिली आणि 10 लाखांची खंडणी वसूल करण्याकरिता जबरदस्ती करून बेदम मारहाण केली. खंडणीची रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी त्यांची सुटका केली. त्यानंतर आंबटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदविला आहे. खंडणीच्या उद्देशाने पूर्व नियोजित कट रचून अपहरण करणाऱ्या तीन मुख्य आरोपींवर शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत 307, 302 कलमांचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

loading image
go to top