esakal | चमत्काराची प्रतीक्षा! आजारी निकिताचा मुलीत अडकला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

चमत्काराची प्रतीक्षा! आजारी निकिताचा मुलीत अडकला जीव

चमत्काराची प्रतीक्षा! आजारी निकिताचा मुलीत अडकला जीव

sakal_logo
By
विवेक राऊत

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : आजारामुळे सहा महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेल्या निकिताला दोन वर्षांच्या मुलीसाठी जगण्याची खूप इच्छा आहे. आपण या आजारातून बरे होऊ, असे तिला रोज वाटते. मात्र, घरच्या परिस्थितीपुढे तिचे आईवडील आणि भाऊ हतबल झाले आहेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या आणण्याचीही ऐपत नसलेल्या वानखडे कुटुंबाला आता काही चमत्कार होण्याचीच प्रतीक्षा आहे. (Help-needed-for-Nikita's-treatment)

निकिता रमेश वानखडे, असे आजारी असलेल्या युवतीचे नाव. चांदूररेल्वे तालुक्यातील राजुरा येथे ती आई-वडिलांच्या कुडाच्या एका झोपडीत राहत आहे. काही वर्षांअगोदर इतर मुलींप्रमाणे तिचे नागपूर येथील युवकासोबत लग्न झाले. त्यातच एका मुलीला तिने जन्मही दिला, पण दुर्दैवाने आजाराने निकिताला ग्रासले. आधीच शरीराने दुबळ्या असलेल्या निकिताचे मनही दुबळे झाले.

हेही वाचा: जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याच्या मृत्यू; एक गंभीर

पालकांनी तिला अनेक दवाखान्यांत दाखविले. परंतु, छोट्या-मोठ्या उपचाराला निकिताचे शरीर साथ देत नसल्याने डॉक्टरांनी सेवाग्रामला हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, दवाखान्यातील औषध आणण्यासाठीही पैसे नसलेल्या वानखडे कुटुंबीयांपुढे तिला कसे वाचवावे, असा यक्षप्रश्न पडला आहे. निकिताचे वडील फडे विकण्याचे काम करतात, तर आई मोलमजुरी करून कसाबसा संसाराचा गाडा ओढत आहे.

भाऊ दुकानात काम करून घराला हातभार लावण्याचे काम करीत असताना पोटच्या गोळ्याला जगविण्यासाठी कुटुंबाची धडपड सुरू आहे. निकिताला ग्रामसेवा लोक अभियानचे संयोजक बंडू आंबटकर यांच्याकडून औषधासाठी मदत मिळाली. परंतु, आजारचे स्वरूप मोठे आहे. अनेकांच्या मदतीने निकितावर सामाजिक बांधीलकीमधून उपचार पूर्ण होऊ शकतात, अशी वानखडे परिवारला आशा आहे.

(Help-needed-for-Nikita's-treatment)

loading image
go to top