esakal | नागपूर रेल्वेस्थानकावर अलर्ट
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर रेल्वेस्थानकावर अलर्ट

नागपूर रेल्वेस्थानकावर अलर्ट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावरील सुरक्षा यंत्रणांनाही अलर्ट करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांकडून नागपूर स्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यांची झाडाझडती घेतली जात असून, संशयीतांवरही पाळत ठेवण्यात येत आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेला गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून देशात 12 ठिकाणी बॉम्ब पेरण्यात येणार असल्या माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशाच्या मध्यभागी असणारे नागपूर रेल्वेस्थानक रेल्वेवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असण्यासह सुरक्षेच्या दृष्टीनेही संवेदनशील आहे. दररोज सरासरी शंभरहून अधिक प्रवासी रेल्वेगाड्या नागपूरमार्गे धावतात तर नियमित 35 ते 40 हजार प्रवाशांचा राबता असतो. कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेतही वाढ केली आहे.
loading image
go to top