उच्च न्यायालयातील वकील चालवितो वडिलांचा वारसा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील यांनी चालविला आहे. ते उच्च न्यायालयात वकील आहेत. वामनराव पाटील यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, रा. सु. गवई यांच्यासोबत आंबेडकरी चळवळीत सहभाग घेतला. चिमूर तालुक्‍यात या चळवळीला रुजविण्याचे काम त्यांनी केले. वडिलांचे सामाजिक कार्याचे संस्कार ऍड. भूपेश यांच्यावर बालवयातच झाले.

चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील यांनी चालविला आहे. ते उच्च न्यायालयात वकील आहेत. वामनराव पाटील यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, रा. सु. गवई यांच्यासोबत आंबेडकरी चळवळीत सहभाग घेतला. चिमूर तालुक्‍यात या चळवळीला रुजविण्याचे काम त्यांनी केले. वडिलांचे सामाजिक कार्याचे संस्कार ऍड. भूपेश यांच्यावर बालवयातच झाले. समाजाचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून विद्यार्थी दशेपासूनच शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी सहभाग घेतला. गोंदेंडा गुफा यात्रेतील नाटकात ते अभिनय करायचे. दिग्दर्शन केले. विद्यार्थ्यांच्या न्यायहक्कासाठी संघटना उभी केली.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विकास संस्थेच्या माध्यमातून युवकांसाठी कार्यक़्रम राबविले जात आहेत. महाराष्ट्र लोकविकास मंचाद्वारे महिलांच्या हक्क व अधिकारांबाबत जागृती केली जाते. सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी धर्मनिरपेक्षता मंचाद्वारे प्रबोधन ते करतात. "बयताड्या', "नावाड्या" नावाचे कथासंग्रह, "गाव पेटून उठतो तेव्हा' हा काव्यसंग्रह त्यांच्या नावे आहेत.वामनराव पाटील स्मृतिप्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्‍यातील अनेक बुद्धविहारांना "बुद्ध आणि त्याचा धम्म" या धम्मग्रंथाचे वितरण केले. विद्यार्थ्यांना गणवेश वाटप. ग्रामीण भागातील जनतेसाठी कायदेविषयक सल्ला व जनजागृती शिबिराचे त्यांनी आयोजन केले.तसेच नेरी येथे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लोकसेवा केंद्राची स्थापना. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संम्मेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. अशाप्रकारे वडिलांच्या समाजकार्याचा वारसा ते आपला उच्च न्यायालयातील वकिली व्यवसाय सांभाळून चालवीत आहेत. या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात आचार्य विनोबा भावे राष्ट्रीय स्वयंसेवक पुरस्कार, नासा इंडिया संस्थेतर्फे दिला जाणारा युथ आफ द इअर पुरस्कार, सम्यक कला प्रतिष्ठानचा राजर्षी शाहू पुरस्कार, ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे दिला जाणारा महात्मा फुले आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: High court lawyer runs father's legacy